महाऑनलाईन हे शासनाच्या विविध सेवा प्राप्त
करण्यासाठीचे एक प्रभावी माध्यम आहे. राज्य
शासनाच्या विविध विभागांच्या कार्यपध्दतीची माहिती आणि
त्या विभागांमार्फत नागरिकांसाठी
उपलब्ध ई-प्रशासकीय सेवांचा लाभ महाऑनलाईनमार्फत
प्राप्त करणे शक्य आहे. विविध प्रकारचे
दाखले, प्रमाणपत्रे, परवाने, वाहनांची नोंदणी अशा अनेक
नागरिकोपयोगी सुविधा महाऑनलाईन या संकेतस्थळाच्या माध्यमातून शासनाने
उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांच्या वेळेचा अपव्यय टाळावा आणि
आवश्यक त्या सुविधा शक्यतो सहज उपलब्ध व्हाव्यात, हा
हेतू महाऑनलाईनमार्फत साध्य होईल,
अशी आशा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा